Monday, December 23, 2024
Homeराज्य6.80 लाख किंमतीचा गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई

6.80 लाख किंमतीचा गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई

मुंबई : मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या कांदिवली युनिटने दहिसर परिसरातून 62 वर्षीय ड्रग्ज तस्कराला अटक केली असून त्यांच्याकडून 27 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की,0आरोपी संपत लहू डोलारे (वय. 62) हा दहिसर परिसरातील शंकर टेलरजवळ उभा होता. पोलिसांना या व्यक्तीवर काही संशय आला आणि त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्याच्याकडून 6 किलो गांजा जप्त करण्यात आला. 

अबब ! 4.66 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त, अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई

पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली. त्याआधारे पोलिसांनी आरोपी तस्कराच्या घरातून 21 किलो गांजा जप्त केला. 

आज आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. गांजा कोठून आणला, कोणाला दिले जाते याचा अधिक तपास सुरू आहे.

मुंबईतील कांदिवली परिसरात इमारत कोसळली !

१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती

 

एस‌.टी. संप : 31 मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हा, अजित पवारांचा इशारा !

संबंधित लेख

लोकप्रिय