मुंबई : राज्यातील ६१ आदिवासी अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. (Cabinet decision) बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. Cabinet decision
17 अनुदानित प्राथमिक आश्रमशाळांना माध्यमिक आश्रमशाळा म्हणून 2024-25 पासून श्रेणीवाढ करण्यात येईल. तसेच 2024-25 पासून इयत्ता 8 वी, 2025-26 पासून इयत्ता 9 वी आणि 2026-27 पासून 10 वीचा वर्ग सुरु करण्यात येईल. 44 अनुदानित माध्यमिक आश्रमशाळांना संलग्न कनिष्ठ महाविद्यालय (कला व विज्ञान) सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या ठिकाणी 2024-25 पासून 11 वी, 2025-26 मध्ये 12 वीचे वर्ग सुरु करण्यात येतील. Cabinet decision
आदिवासी विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे तसेच मुलींमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी आश्रमशाळांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
हे ही वाचा :
महत्वाची बातमी : यापुढे शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक, ‘असा’ नावाचा असेल अनुक्रम
मोठी बातमी : देशात CAA’नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू
इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश
आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान
मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का