Saturday, March 15, 2025

मोठी बातमी : CAA आंदोलना दरम्यान शाहीन बाग मध्ये गोळीबार करणारा कपिल गुज्जरचा भाजप मध्ये प्रवेश

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

दिल्ली : नागरीकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील आंदोलनादरम्यान शाहीन बाग परिसरात गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जर याने आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केल्याचं समोर आलंय. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील पक्ष कार्यालयात त्यानं आज अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला. 

पक्षात प्रवेश घेतल्यानंतर कपिल गुर्जर म्हणाला की, हिंदुत्व मजबूत करण्यासाठी भाजपा काम करीत आहे, अशा स्थितीत मी भाजप सोबत आहे.

या वर्षाच्या सुरुवातीस दिल्लीतील शाहीन बाग भागात नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन होते. याच भागात जाऊन कपिल गुर्जरने ‘भारतात फक्त हिदूंनाच राहण्याचाच अधिकार आहे, अशा घोषणा देत त्यानं हा गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र त्यानंतर कपिल गुर्जरला 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन मंजूर झाला.

 

 कपिल गुर्जरने गोळीबार केल्यानंतर त्याचे आम आदमी पक्षाच्या नेत्यांसोबतचे फोटो शेअर करण्यात आले होते. परंतु आता कित्येक महिन्यांनंतर कपिल गुर्जर अधिकृतपणे भाजपमध्ये दाखल झाला आहे. 

‘शाहीन बाग आंदोलन’ हे समाजात भेदभाव करणाऱ्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधाचं केंद्रं बनलं होतं. हजारोंच्या संख्येने मुस्लिम महिला शाहीन बागेत सरकारच्या विरोधात ठाण मांडून बसल्या होत्या. या आंदोलनाला धर्मनिरपेक्ष पक्षांसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा होता.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles