Sunday, April 6, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ग.दि. माडगुळकर नाट्यगृहात सेवा सुविधांचा अभाव..

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महानगरपालिकेच्या ग.दि.मांडगुळकर नाट्यगृह, आकुर्डी मे महिन्यामध्ये माजी नगरसेवक अमित गावडे यांनी कार्यक्रम घेतला तेव्हा ऑडीटोरीयम ए.सी. बंद होते मात्र महानगरपालिकेने दिनांक ०८ जून आणि ०९ जून २०२३ रोजी भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी तेथील ए.सी.ची सुविधा व्यवस्थित चालू होती त्यांनंतर दिनांक १७ जून २०२३ रोजी झी मराठी तर्फे उत्सव नात्यांचा कार्यक्रमाच्या दिवशीच तो अचानक बंद पडला? महानगरपालिका व इतर सामांन्य कार्यक्रमांमध्ये प्रशासनाकडून असा भेदभाव का ? असा सवाल आम्हांला पडला आहे.

नाट्यगृहाचे दरवाजांना हॅन्डल नसल्याचे तसेच तेथील इलेक्ट्रीक ए.सी. सेवा उपकरण बंद पडल्याने कार्यक्रम आयोजकांनी व्यवस्थापकांना सांगितले असता त्यांनी टाळाटाळ केली त्यामुळे नाट्यगृहात ए.सी. सेवा असताना देखील ए.सी. सेवे अभावी कार्यक्रम घ्यावा लागला, सेवेच्या कमतरतेमुळे प्रेषकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महानरगपालिकेच्या नियमानुसार सर्व भाडेवाढ रक्कम भरूनही जर सेवा मिळत नसतील तर, महानगरलिका जनतेची फसवणूक करत आहात असे म्हणायला हरकत नाही.

तरी काम नको असणाऱ्या व उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या व्यवथापक, कर्मचारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी व नाट्यगृहात नियमानुसार असलेल्या सर्व सेवा सुविधा तत्काळ चालू कराव्यात, अशी मागणी अर्बन सेल प्रदेशाध्यक्षा खासदार ॲड.सौ वंदनाताई चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि शहराध्यक्ष मा.अजितभाऊ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाने अर्बन सेल अध्यक्षा मनिषा गटकळ व सहकार्यकारीणी यांनी आपल्या ‍निवेदन पत्राद्वारे केली आहे.

सदर ‍निवेदन देतांना अर्बन सेल महिला अध्यक्षा मनिषा गटकळ, निरीक्षक-पल्लवीताई पांढरे, निरीक्षक-लताताई ओव्हाळ, निरीक्षक-सुनीताताई अडसूळ, भोसरी विधानसभा अध्यक्ष-मनिषा जडर, चिंचवड़ विधानसभा अध्यक्ष-प्रियाताई देशमुख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष-विजयाताई काटे, शहर कमिटी समन्वयक- शोभा उघडे, निशा जामदार, मीरा कांबळे, शोभा औटी, रिनाज शिकलगार, सोनाली नितनवरे, युवक समन्वयक-मेघराज लोखंडे, सरचिटणीस राजन नायर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये


Video : सिक्कीममध्ये भयंकर भूस्खलन झाल्याने रस्ते बंद, जवानांकडून ३५०० पर्यटकांची सुटका


ब्रेकिंग न्यूज : MPSC मध्ये राज्यात तिसरी, पण मित्रासोबत फिरायला गेली अन् घात झाला ; वाचून हादराल

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles