मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे भीषण अपघात झाला आहे. येथे इमारत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी घरात उपस्थित असलेल्या चौघांना बाहेर काढले. जखमींमध्ये दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. यातील एका मुलाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित तीन जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम इस्लाम कंपाउंड, उत्तर भारतीय सेवा संघ चाळ, मुंबई येथे ग्राउंड प्लस वन इमारत कोसळली. पोलीस, अग्निशमन दल आणि बीएमसीचे पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत.
पोलिसांनी ठेकेदाराला घेतले ताब्यात
नगरसेवक कमलेश यादव यांनी या अपघातासाठी बीएमसीला जबाबदार धरले आहे. बीएमसीच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे, असा आरोप कमलेश यादव यांनी केला आहे. या अपघातामुळे या घरात राहणारे कुटुंब अचानक रस्त्यावर आले आहे. कुटुंबातील मुलाचा मृत्यू आणि डोक्यावरील छत गायब होणे या दुहेरी दु:खाने कुटुंबावर संकटाचा डोंगर निर्माण झाला आहे. या अपघातानंतर पोलिसांनी बीएमसीच्या कंत्राटदाराला ताब्यात घेतले आहे. त्या ठेकेदारावर कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
व्हिडिओ : फिलिपाईन्स मध्ये ज्वालामुखीचा महाउद्रेक
6.80 लाख किंमतीचा गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई
मोठी खुशखबर ! महाराष्ट्र 1 एप्रिलपासून CNG स्वस्त