BSF Jawan Constable PK Singh : पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर आज एका भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाने चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याने ते पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात गेले आहे. या जवानाचे नाव पीके सिंह असे असून, ते श्रीनगरमधील बीएसएफच्या 24 व्या युनिटमध्ये तैनात होते. ही घटना पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (22 एप्रिल 2025) अवघ्या दोन दिवसांत घडली आहे, ज्यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. (हेही वाचा – मोठी बातमी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला, २६ पर्यटकांचा मृत्यू)
BSF Jawan PK Singh पाकिस्तानच्या ताब्यात
पीके सिंह हे 182 व्या बीएसएफ बटालियनचा कॉन्स्टेबल आहे. ते पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर ड्युटीवर तैनात होते. 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी ते सीमेजवळ गस्त घालत असताना चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले. याची माहिती मिळताच पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले. या जवानाचे काही फोटो समोर आले आहेत. पीके सिंह हे एका कारमध्ये बसल्याचे दिसत आहे. सोबतच त्यांच्या डोळ्यावल एक पट्टी बांधण्यात आल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे ते सैनिकी पोषाखातच दिसत आहेत. (हेही वाचा – पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेची तीव्र प्रतिक्रिया: भारताला दिला पूर्ण पाठिंबा)
यापूर्वीही अशा घटना
अशा प्रकारच्या घटना भारत-पाकिस्तान सीमेवर यापूर्वीही घडल्या आहेत. सीमेवर गस्त घालताना कधीकधी जवान चुकून सीमा ओलांडतात, आणि अशा प्रकरणांमध्ये दोन्ही देशांचे सीमा सुरक्षा दल फ्लॅग मीटिंगद्वारे समस्येचे निराकरण करतात. मात्र, सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आता पुढे नेमकं काय होणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. या संदर्भातील वृत्त आज तक या वृत्त वाहिनीने दिले आहे. (हेही वाचा – लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हफ्ता कधी मिळणार ? मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली तारिख)