Sunday, May 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेची तीव्र प्रतिक्रिया: भारताला दिला पूर्ण पाठिंबा

Pahalgam Terrorist Attack On Donald Trump : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन विदेशी पर्यटक, महाराष्ट्रातील पाच नागरिक आणि इतर राज्यांतील पर्यटकांचा समावेश आहे.

---Advertisement---

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या लष्कर-ए-तैयबाच्या उपशाखेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हा हल्ला २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील सर्वात घातक हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे. या घटनेनंतर अमेरिकेसह अनेक देशांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. (हेही वाचा – मोठी बातमी : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर, शक्ति दुबे देशात पहिली)

पहलगाम हल्ल्याचा केला निषेध | Pahalgam On Donald Trump

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, “काश्मीरमधील बातमी अत्यंत चिंताजनक आहे. दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारतासोबत ठामपणे उभा आहे. आम्ही मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील नागरिकांना आमचा पूर्ण पाठिंबा आणि सहानुभूती आहे.” (हेही वाचा – मोठी बातमी : सोन्याचा दर 1 लाखांवर ; वाचा पुणे, मुंबई मधील सोन्याचे दर)

---Advertisement---

ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी या हल्ल्याच्या दोषींना न्यायाच्या कक्षेत आणण्यासाठी भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी म्हटले, “भारत आणि अमेरिका दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात एकत्र आहेत.”  (हेही वाचा – ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन : भारतात 3 दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर)

उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचे वक्तव्य

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स, जे सध्या भारत दौऱ्यावर आहेत, यांनीही हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी सामाज माध्यमांवर लिहिले, “उषा आणि मी पहलगाम, भारत येथील विनाशकारी दहशतवादी हल्ल्याच्या बळींप्रती शोक व्यक्त करतो. गेल्या काही दिवसांत आम्ही या देशाच्या सौंदर्याने आणि लोकांच्या प्रेमाने भारावून गेलो आहोत. या भयानक हल्ल्यामुळे शोक करणाऱ्यांसोबत आमच्या भावना आणि प्रार्थना आहेत.  (हेही वाचा – मोठी बातमी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला, २६ पर्यटकांचा मृत्यू)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles