शहरातील ३ हजार बोअरवेल कोरड्या
घरगुती पाणी वापरावर २० टक्के कपात, कठोर दंड
Bangalore : दि.१०- यावर्षी पुरेशा पावसाअभावी कावेरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय घट झाली आहे. याचा भीषण परिणाम संपूर्ण कर्नाटकात पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर आणि शेती सिंचनावर विपरीत परिणाम झाला आहे. याशिवाय बोअरवेलमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. Severe water shortage in Bangalore
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले – ‘सर्व बोअरवेलपैकी सुमारे ३,००० बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. बंगळुरू मुख्य शहर आणि आसपासच्या परिघातील ७ हजार बोअरवेल अति पाण्याच्या उपशामुळे कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
घरगुती पाणी वापरावर २० टक्के कपात,कठोर दंड
सर्व प्रकारच्या सार्वजनिक उत्सव,समारंभात पाणी वापरावर बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनास सहकार्य करण्यासाठी नागरिकांनी हात आणि तोंड धुण्यासाठी डिस्पोजेबल कटलरी आणि ओले रुमाल वापरण्यास सांगितले आहे. रहिवाशांच्या पाण्याच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी इतर काही ठिकाणी सरकार व पालिका प्रशासनाने स्वतंत्र सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. पाण्याचा वापर २०% कमी न करणाऱ्या रहिवाशांना ५००० रुपये अतिरिक्त दंड आकारला जाईल, असा कठोर इशारा बंगलोर जलव्यवस्थापन व मनपा प्रशासनाने जाहीरपणे दिला आहे.
बंगळूर आयटी सिटी भोवताली लोकसंख्या २४ लाख असून बंगळूर हे दक्षिण भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आयटी शहर आहे.शहरातील उद्योगासह सर्वांना १८५० एमएलडी पाणी साठा राखीव ठेवावा लागतो. यावर्षी राखीव साठा ठेवण्या इतके पाणी उपलब्ध नाही. उचभ्रु सोसायट्या, झोपडपट्ट्या,आणि तत्सम विभागात मोठ्या प्रमाणात लोक इथे राहतात, त्याशिवाय स्थलंतरित लोक दरवर्षी येण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
मान्सून पाऊस कमी झाल्यामुळे कर्नाटकात अलिकडच्या वर्षांत सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे. राज्यातील २३६ तालुक्यांपैकी २१६ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत.कर्नाटक सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकरी,गुरेढोरे यांच्यासाठी राखीव जलसाठा ठेवला आहे. सलग दोन वर्षे भीषण दुष्काळामुळे वाढत्या तापमानामुळे कावेरी आणि राज्यातील निवडक जलसाठ्यांचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे.
खाजगी टँकर्स २००० रुपये दराने या परिस्थितीचा फायदा घेत आहेत,पाणी संकटाचा फायदा घेऊन अत्याधिक किंमती आकारात आहेत.१०००० लिटर पाणी टँकरसाठी एकेकाळी योग्य समजल्या जाणाऱ्या रू ६०० ते रू ८०० च्या दराचे पाणी टँकर्स २००० रू दराने पाणी विकत आहेत.
बेकायदेशीर पाणी वाटप करणाऱ्या टँकर्स वर सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे. आणि जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा :
मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून
मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक
समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार
पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त
ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा