Monday, December 23, 2024
Homeराज्यब्रेकिंग : राज्यात बरसणार पाऊस, 'या" जिल्ह्यांना अलर्ट जारी

ब्रेकिंग : राज्यात बरसणार पाऊस, ‘या” जिल्ह्यांना अलर्ट जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट (Vidarbha Heat Wave) आहे.

पण, उन्हाच्या झळा कमी होऊन राज्यात परत पावसाचं आगमन होणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची (Maharashtra Rain Alert) शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. लो हवामान विभागानं (IMD) अंदाज वर्तवला आहे.

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

पण, आता चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. आज सायंकाळपर्यंत दोन्ही जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावासाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तर येत्या ५ एप्रिलला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात दमदार पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ६ एप्रिलला देखील या चारही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि गडगडाटासह पावसाची अंदाज आहे.

आरोग्य सल्ला : रणरणत्या उन्हात अशी घ्या त्वचेची काळजी !

“अज्ञानातून ज्ञानाकडे” नेणारी गुढी उभारून विद्यार्थीनींनी केले पुस्तक वाचन


संबंधित लेख

लोकप्रिय