Home नोकरी ब्रेकिंग न्यूज : महाराष्ट्रात तलाठी पदाच्या 4,625 जागांसाठी भरती; सरकारने काढले आदेश

ब्रेकिंग न्यूज : महाराष्ट्रात तलाठी पदाच्या 4,625 जागांसाठी भरती; सरकारने काढले आदेश

Appointments to 121 candidates in Mandal Agriculture Officer Cadre

Talathi recruitment : राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. राज्यात तब्बल 4 हजार 625 जागांची तलाठी पदासाठी मेगाभरती केली जाणार असून याबाबत सरकारने आदेश देखील काढले आहेत, असे ई टिव्ही भारतनं दिले आहे. त्यानुसार 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

राज्य सरकारने तलाठी पदासाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाने याबाबतचा एक आदेश नुकताच जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील रिक्त असलेल्या 4 हजार 625 तलाठी पदांच्या जागा येत्या 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान भरण्यात येणार आहेत. महसूल व वन विभागाकडून आदेश काढण्यात आलेल्या आदेशात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.

तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी-जास्त) होण्याची शक्यता आहे.

सरळ सेवा पद्धतीने राज्यस्तरावरून एकत्रितरित्या परीक्षा घेतली जाणार आहे. तलाठी संवर्गाची यादी तयार करताना संबंधित जिल्ह्यात आवश्यक असलेल्या पदांचा विचार करुनच प्रत्येक जिल्ह्याची जिल्हानिहाय स्वतंत्र निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज केलेला जिल्हा आणि त्यांना मिळालेले गुण हे त्या त्या जिल्ह्यातील यादीनुसारच गृहीत धरले जातील. सदर उमेदवाराचा अन्य जिल्ह्यातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही. सर्व निवड झालेल्या उमेदवारांना उपविभाग नेमून नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असतील.

 हे ही वाचा :

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

 नोकरीच्या बातम्या : 

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

Exit mobile version