मुंबई / वर्षा चव्हाण – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती असलेले व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या घरी आणि इतर काही ठिकाणी ईडीने शुक्रवारी (29 नोव्हेंबर) छापे टाकले. मुंबई आणि उत्तर प्रदेशातील 15 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.
हे सर्च ऑपरेशन पोर्नोग्राफिक सामग्री उत्पादन आणि मोबाइल ॲप्सद्वारे तिचा वितरण या संबंधीच्या मनी लॉन्ड्रिंग तपासाशी संबंधित आहे. ईडीचा तपास मुंबई पोलिसांनी 2021 मध्ये राज कुंद्राविरुद्ध पोर्न उत्पादनाच्या आरोपांवर आधारित सुरू केला होता.
राज कुंद्रा (Raj Kundra) यांना 2021 मध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली होती, मात्र नंतर ते जामिनावर सुटले.
राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी पोर्नोग्राफी फिल्मच्या माध्यमातून प्रचंड कमाई करत होते. याप्रकरणी एका तरुणीनं मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात या रॅकेट संदर्भात पहिल्यांदा 4 फेब्रुवारी 2021 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली होती.
हे ही वाचा :
PCMC : औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग
Cold wave : महाराष्ट्रात थंडीची लाट, पुणे 9.9°C
PCMC : भारतीय संविधान हा मानवतेचा जाहिरनामा; महापालिका आयोजित परिसंवादात वक्त्यांचा सूर
PCMC : लेवा भ्रातृ मंडळाच्या वतीने डिजिटल संस्कार शिबिराचे आयोजन