Sunday, December 22, 2024
Homeजिल्हाब्रेकिंग : सीएनजी च्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून नवेज्ञदर लागू

ब्रेकिंग : सीएनजी च्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून नवेज्ञदर लागू

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवडमधील सीएनजीच्या दरामध्ये दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (Maharashtra Natural Gas Limited – MNGL) ने घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना बुधवारी (दि.8) मध्यरात्रीनंतर एक किलो सीएनजीसाठी 82 रुपये मोजावे लागणार आहेत. 

मागील काही महिन्यात सीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ (CNG Price Hike In Pune – Pimpri Chinchwad) करण्यात आली आहे. पुण्यामध्ये एप्रिलमध्ये सीएनजीचा दर 62.20 रुपये होता. त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात तीन वेळा दर वाढ करण्यात आली होती.

पुण्यात 28 एप्रिल रोजी मध्यरात्री सीएनजीचा दर 77.20 रुपये झाला. त्यानंतर 20 मे च्या मध्यरात्री यामध्ये दोन रुपयांची पुन्हा वाढ करण्यात आली. आता पुन्हा बुधवारी (दि.8) मध्यरात्रीपासून दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून पुण्यातील वाहन चालकांना सीएनजीसाठी 82 रुपये मोजावे लागणार आहेत.

ब्रेकिंग : माळशेज घाटात दरीत उडी मारून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

पुणे येथे 10 वी आणि 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 876 जागांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 पदांसाठी भरती, 40000 रूपये पगाराची नोकरी


संबंधित लेख

लोकप्रिय