Thursday, November 21, 2024
Homeराष्ट्रीयkedarnath : उत्तराखंड केदारनाथ येथे ढगफुटी, 200 यात्रेकरू अडकले

kedarnath : उत्तराखंड केदारनाथ येथे ढगफुटी, 200 यात्रेकरू अडकले

केदारनाथ : उत्तराखंड मधील केदारनाथ, (kedarnath) सोनप्रयाग भागात दि. ३१ जुलै रोजी रात्री ९ वा ढगफुटी मुळे मंदाकिनी नदीला मोठा महापूर आला आहे, केदारनाथ आणि सोनप्रयाग मार्गावरील हॉटेल्स, मार्केटचे मोठे नुकसान झाले आहे, अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव महामार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

हरिद्वारमध्ये बुधवारी संध्याकाळी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खारखरी नदी दुथडी भरून वाहून गेली, वाहने वाहून गेली आणि कानखल पोलिस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यासह अनेक रस्ते पाण्याखाली गेले. या भागात हॉटेल्स, दुकाने, मार्केटचे नुकसान झल्याचे वृत्त हिंदी वाहिन्यांनी दिले आहे. हरिद्वार, कानखल आणि ज्वालापूर या भागांना पुराचा मोठा फटका बसला आहे.

उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यात चारधाम यात्रेच्या मुख्य मार्गावर येणाऱ्या घणसालीच्या जखनियाली आणि नौताडमध्ये ढगफुटी झाली.

येथे हॉटेल वाहून गेल्यामुळे या नैसर्गिक आपत्तीत दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ढगफुटीमुळे जखनियाळी गावातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेतजमीन उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी जखनियाली गावातील तीन जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रमुख ठिकाणी २०० यात्रेकरू कुठेतरी अडकले असावेत, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. (kedarnath)

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ब्रिजेश भट्ट यांनी सांगितले की, नौतर टोक येथे एक हॉटेल वाहून गेले. ज्यामध्ये हॉटेल मालक भानू प्रसाद (50), त्यांची पत्नी नीलम देवी (45) आणि मुलगा विपिन (28) बेपत्ता होते. बचाव कार्यादरम्यान घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर भानू आणि त्याची पत्नी नीलम यांचे मृतदेह सापडले. त्याचवेळी बेपत्ता तरुण जखमी अवस्थेत सापडला. तर दुसरीकडे अनेक प्राणीही मोठ्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना केदर्हारनाथ आणि सोनप्रयागला तातडीने पाठवले आहे. या पथकांना यात्रेकरूंची सुटका करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी तातडीने दिले आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

संबंधित लेख

लोकप्रिय