Friday, March 14, 2025

ब्रेकिंग : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर वक्तव्ये करणे, समाजात तेढ निर्माण करणे असे आरोप करण्यात आले आहेत. हि तक्रार धनगर समाजातील विविध संघटनांनीच पडळकर यांच्याविरोधात दिली आहे.

व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज आता एडिटही करता येणार, काय आहे खासियत वाचा !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी चौंडी येथे मोठा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. त्यावेळी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर देखील आले होते. त्यावेळी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी चौंडीमध्ये जाण्यापासून अडवला. त्यानंतर जवळपास अर्धा तास त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. यावेळी पडळकरांनी केलेल्या भाषणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अत्यंत आक्रमक भाषेत बोचरी टीका केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 129 पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

याच पार्श्वभूमीवर धनगर संघटना पडळकर यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी रविंद्र सखाराम पांडुळे या व्यक्तीने पडळकरांच्या विरोधात तक्रार दिली आहे. कर्जत पोलिस ठाण्यात कलम ५०५ (२) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आयडीबीआय बँकेत तब्बल 1544 जागांसाठी मेगा भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

तेल आणि नैसर्गिक वायू महामंड अंतर्गत मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, 6 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Related Articles

- Advertisement -

Latest Articles