Thursday, April 3, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : भाजप – शिंदे गटात तुफान राडा, भाजप देखील आक्रमक

कल्याण : भाजप व शिवसेना शिंदे गटात मोठा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचे चिन्ह भिंतीवर रंगवत असताना हा राडा झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या समर्थकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विरोध करत बेदम मारहाण केली.

---Advertisement---

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात भाजपचे कार्यकर्ते भाजपचे चिन्ह भिंतीवर रंगवत होते. त्यावेळी शिंदे गटाचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक त्या ठिकाणी आले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध करत तीन ते चार कार्यकर्त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेतला.

भाजप कल्याण शहराध्यक्ष संजय मोरे यांनी तुमच्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिला. घडल्या या प्रकाराबाबत भाजप शहर अध्यक्षसह कार्यकर्ते कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेत. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

---Advertisement---

दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या सांगण्यावरूनच भाजप कार्यकर्त्याना मारहाण झाल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles