Monday, December 23, 2024
Homeराज्यब्रेकिंग : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलचं निधन

ब्रेकिंग : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलचं निधन

Photo : ANI

मुंबई : कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत आलेल्या पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी दुपारी प्रभाकर साईलचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर किरण गोसावी चर्चेत आला. प्रभाकर हा किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता. तसेच, प्रभाकर हा कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील एनसीबीचे पंच साक्षीदार होता. त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

दरम्यान, बॉलिवूड स्टार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला सोडवण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोपही प्रभाकर साईलतर्फे करण्यात आला होता. गेल्या वर्षी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूजवर ड्रग्ज सापडले होते, त्यावेळी या विषयावर दोरदार चर्चा झाली होती.

संबंधित लेख

लोकप्रिय