Tuesday, June 18, 2024
Homeराजकारणब्रेकिंग : अजित पवार यांनी ३ वर्षांत तिसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

ब्रेकिंग : अजित पवार यांनी ३ वर्षांत तिसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra Politics) विविध राजकीय घडामोडी घडत आहे. असे असताना राज्यात आता पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे – फडणवीस सरकार मध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी ३ वर्षांत तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या सोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हे ही वाचा :

मोठी बातमी : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नऊ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

ब्रेकिंग न्युज : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ?

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 1558 पदांची भरती; पात्रता 10वी पास

ऊसतोडणी कामगारांना सुविधा देणार – साखर आयुक्त व समाज कल्याण आयुक्त यांची ग्वाही

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय