मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंडाळी केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. काल अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ३० आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली. मात्र, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली नाही. परंतु आज राष्ट्रवादीच्या तब्बल २१ पदाधिकाऱ्यांना शरद पवारांनी बडतर्फ केले आहे.
एनसीपी च्या अधिकृत ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी पुढील यादीनुसार विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. या सर्वांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून व संघटनेतील पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे.”
राष्ट्रवादीने पक्षातून निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये रत्नागिरीचे जिल्ह्याध्यक्ष बाबाजी जाधव, वसई-विरार जिल्ह्याध्यक्ष राजाराम मुळीक, तसेच पिंपरी चिंचवड शहाराध्यक्ष अजित गव्हाणे, प्रशांत शितळे, राहुल भोसले, जगदीश शेट्टी, तसेच लोकसभा दिंडोरीचे रविंद्र पगार यांच्यासह राष्ट्रवादीच्या २१ पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीने बडतर्फ केले आहे.
हे ही वाचा :
विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव
PCMC : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, राहुल कलाटे यांचा शिंदे गटात प्रवेश
ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
ब्रेकिंग : किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडिओवर सोमय्या म्हणतात…
आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून