Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब

ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब

NDA Alliance : लोकसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूचे महत्व प्रचंड वाढले आहे. याच कारणामुळे दोन्ही पक्षांनी भाजपवर प्रेशर पॉलिटिक्स सुरू केले आहे. या दोन्ही पक्षांनी प्रमुख मंत्रालयांची मागणी करत एनडीए (NDA Alliance) मध्ये एक बाँम्ब टाकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टीडीपी पार्टीने लोकसभेच्या स्पीकर पदासह पाच मोठ्या मंत्रालयांची मागणी केली आहे. टीडीपी लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी जास्त प्रयत्न करत आहे. टीडीपीने अर्थ मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय यांसारख्या महत्वाच्या मंत्रालयांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षानेही बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसापासून प्रलंबित आहे. समान नागरी कायदा आणि अग्नीवीर योजनेबाबत व्यापक चर्चा व्हावी, असे या पक्षाचे महासचिव के.सी. त्यागी यांनी म्हटले आहे.

टीडीपी सध्या एनडीएत दुसरा मोठा पक्ष आहे. या पक्षाचे 16 खासदार आहेत. तर नितीश कुमार यांच्या पक्षाचे 12 खासदार आहेत. भाजप हा एनडीए आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. याव्यतिरिक्त शिंदे गटाचे सात खासदार आहेत.

NDA Alliance ची बैठक

राजधानी दिल्लीत काल एनडीएची (NDA Alliance) महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूच्या खुर्चीवर नायडू बसल्याचे फोटोही झळकले होते. नायडूंच्या शेजारी नितीशकुमार बसले होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !

साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत

10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना विविध विभागात नोकरीची सुवर्णसंधी

ब्रेकिंग : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला थप्पड मारणारी महिला जवान निलंबित

एकही जागा न मागता मी सपोर्ट केला मला कॅबिनेट मंत्री करा – रामदास आठवले

मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा

राहुल गांधी यांना एका खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा

मोठी बातमी : CISF च्या जवानाने थेट कंगना रणौतच्या कालशिलात लगावली, वाचा काय आहे प्रकरण !

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीची तारिख ठरली, मात्र…

फार्मासिस्ट, नर्स, टेक्निशियन, सायंटिफिक ऑफिसर अशा विविध पदांसाठी मोठी भरती

बारामती लोकसभेला वाजली तुतारी विधानसभेत कोण पडणार अजित दादांवर भारी ?

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

संबंधित लेख

लोकप्रिय