Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडप्रजासत्ताक दिनानिमित्त स्वराज्य फाऊंडेशन मोशी तर्फे रक्तदान शिबीर

प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वराज्य फाऊंडेशन मोशी तर्फे रक्तदान शिबीर

मोशी, ता.26 : 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वराज्य फाऊंडेशन मोशी तर्फे रक्तदान शिबीर पार पडले. कोरोना काळामध्ये रक्ताची खूप गरज भासत आहे, त्या प्रमाणात रक्तदान होताना दिसत नाही, लोक बाहेर जाऊन रक्तदान करणे टाळत आहे. 

राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने हा तुटवडा कमी करण्याच्या उद्देशाने “प्रजासत्ताक दिनी करू रक्तदान, तिरंग्याची वाढवू शान” ही संकल्पना मनात ठेऊन 26 जानेवारी रोजी जी. के. पॅलसिओ सोसायटी शिवरोड बोऱ्हाडेवाडी मोशी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यासोबत जेष्ठ नागरिक व महिला असे सर्व मिळून 150 लोकांचे फ्री हेल्थ चेकअप करण्यात आले तसेच मोफत BMI टेस्ट ही करण्यात आली. या रक्तदान शिबिराला सोसायटी तसेच शाहूनगर, दिघी, चाकण, देहू, आणि जवळ पासच्या परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

हा कार्यक्रम स्वराज्य फाऊंडेशन मोशी मार्फत आयोजित करण्यात आला होता. स्वराज्य फाऊंडेशन हे गेले 3 वर्षापासून सामाजिक कार्यक्रम राबवत आहे. त्यामध्ये गडकिल्ले सवर्धन, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य असे अनेक क्षेत्रात कार्यरत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय