Friday, March 14, 2025

सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची; भाषा संवर्धनासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

प्रतिनिधी :- राज्यातील सर्व शालेय अभ्यासक्रमांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी आपल्या अधिकृत फेसबुक वालवरून माहिती दिली आहे.  

          या आदेशाची अंमलबजावणी करताना शालेय वर्ष २०२०-२०२१ राज्यातील सर्व अमराठी माध्यमांच्या राज्य अभ्यसक्रमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी व इयत्ता सहावी या इयत्तांना मराठी भाषा अनिवार्य करताना इतर इयत्तांना टप्प्याटप्प्याने हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. 

           शालेय स्तरानुसार राज्यातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( सी.बी.एस.ई. ) , भारतीय माध्यमिक शिक्षण परिषद ( आय.सी.एस.ई. ) , आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ ( आय.बी. ) तसेच केंब्रीज व अन्य मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या खाजगी / केंद्रीय शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी या इयत्तांसाठी अध्यापन व अध्ययनामध्ये मराठी विषय अनिवार्य राहील. त्यानुसार शालेय वर्ष २०२०-२०२१ पासून इयत्ता पहिली व सहावी यासाठी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles