Friday, March 14, 2025

विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याची या संघटनेने केली मागणी

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Yनाशिक(प्रतिनिधी):- सर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क त्वरित त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची मागणी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

         पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, ८ मे रोजी फेसबुक लाईव्ह द्वारे राज्यातील पदवी पदव्युत्तर परिक्षांविषयी काही महत्त्वाच्या घोषणा केल्यात. त्यात प्रामुख्याने आपण केवळ अंतिम वर्ष / सेमिस्टरच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. त्याच प्रमाणे आपण लॉकडाऊनची स्थिती आणि कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेऊन गरज भासल्यास निर्णयावर पुर्नविचार करणार असल्याची माहिती दिली. 

            आपण विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पदवी व पदव्युत्तर च्या शेवटच्या सत्राच्या/वर्षाच्या परीक्षा देखील रद्द करण्याची शिफारस केलेली आहे. परंतु आपल्या संपूर्ण विवेचनात आपण शेवटच्या वर्षात अध्ययन करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग चा विषय विचारात घेतलेला दिसत नाही. शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द जरी केल्या तरी बॅकलॉगमुळे विद्यार्थ्यांची पदवी अपूर्ण राहून पुढील अभ्यासक्रमात त्यांना प्रवेश घेता येणार नाही, या बाबीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

           या विषयाला दुर्लक्ष केल्यास राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची दाट शक्यता असल्याचे एआयएसएफ ने म्हटले आहे.

           त्यामुळे शेवटच्या वर्षात अध्ययन करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉक विषयांच्या मूल्यमापनासाठी पर्यायी व्यवस्था उभी करावी, अन्यथा शेवटच्या सत्राच्या परीक्षांसोबत बॅकलॉकच्या परीक्षा देखील घेण्यात याव्या, सर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क त्वरित त्यांच्या बँक खात्यात वर्ग करावे. चालू सत्राची संपूर्ण फी ही विद्यार्थ्यांना परत मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles