Tuesday, December 3, 2024
Homeकृषीवडवणी तालुक्यातील दोन हजार कापुस ऊत्पादक शेतकऱ्यांचा वाली कोण ?

वडवणी तालुक्यातील दोन हजार कापुस ऊत्पादक शेतकऱ्यांचा वाली कोण ?

वडवणी(प्रतिनिधी):- जगाचा पोशिंदा समजला जाणाऱ्या शेतकऱ्यावर गेली चार वर्ष झाले कोरड्या दुष्काळाचे संकट पसरले होते. त्याला सावरतो ना सावसतो या वर्षी कोरोना संसर्ग आजार शेतकऱ्यांच्या मुळावरच ऊठला आहे. वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणुन कापुस मोठ्या प्रमाणात पिकवला जातो कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे गेली दोन महीने झाले शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी बंद आसल्याने शासनाकडे तालुक्यातील दोन हाजार शेतकऱ्यांचा राहीलेल्या कापसाची नोंद आहे.तालुक्यात शेतकऱ्यांचा कापुस खरेदी करण्यासाठी शासनाची एकही जिनिंग चालु नाही.तालुक्यात आजुन दोन हजार शेतकऱ्यांकडे कापुस घरातच पडुन आसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे.जिल्हाअधिकारी तुम्ही तरी शेतकऱ्यांचे माय बाप बनऊन लक्ष द्या आसा अर्त टाहो शेतकरी करत आहेत.

     

        पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत. शेतकऱ्यांच समजल जानार पांडर सोनं कापुस अजुनही

घरातच पडुन असल्याने पुढिल बी बियाने कशाने खरेदी करावे आपल्या संसाराचा गाडा कसा चालवायचा याची चिंता बळीराजाला पडली आहे.सोशल डिस्टनसिंगचे पालन करत धारूर तालुक्यातील भोपा येथील शासकीय खरेदी केंद्रावर आतापर्यंत वडवणी तालुक्यातील फक्त दोन से शेतकऱ्यांचा कापुस खरेदी केला आहे.आता त्या जिनींग चालकानेही वडवणी तालुक्यातील कापुस घेण्यास नकार दिला आहे.पावसाळा दहा ते पंधरा दिवसावरच आल्याने शेतकऱ्यांचा कापुस घरातच पडुन आहे.कापुस नाही गेला तर पाऊस पडल्यानंतर पुडील बीयाने कशाने खरेदी करावे आपला संसार कसा चालवावा ही मोठी चिंता शेतकऱ्यां समोर पडली आहे.राहीलेल्या वडवणी तालुक्यातील दोन हजार शेतकऱ्यांना वाली कोण जिल्हा अधिकारी तुम्ही तरी शेतकऱ्यांचे माय बाप बनुन लक्ष द्या अशी शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय