JP Nadda : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (RSS) मोठे विधान केलं आहे. आता आम्ही सक्षम, भाजप पक्ष आमचा आम्ही चालवतो, असं मोठं विधान भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी केले आहे. नड्डा यांच्या या विधानाची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यावेळी नड्डा यांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संबंधांवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना जेपी नड्डा यांनी सुरुवातीला भाजपला संघाची गरज लागायची. आता आम्ही सक्षम झालो आहोत. भाजप स्वत:च्या बळावर चालते. संघ ही वैचारिक आघाडी आहे, अशा शब्दांत नड्डा यांनी भाजप आणि संघाच्या संबंधांवर भाष्य केलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे, तर भाजप हा राजकीय पक्ष आहे, असे देखील जेपी नड्डा यांनी स्पष्ट केले. यासोबतच मथुरा, काशीतल्या मंदिर बांधणीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नव्या मंदिरनिर्माणाचा ना विचार, ना कल्पना, ना इच्छा, असंही जेपी नड्डा म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंची JP Nadda यांच्यावर टीका
दरम्यान, मुंबईत आज इंडिया आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाना साधला. जे पी नड्डा म्हणाले होते एकाच पक्ष देशात राहील. म्हणजे आता हे संघाला सुद्धा नष्ट करायला निघाले आहेत. नड्डा म्हणतात भाजप स्वयंपूर्ण झालाय म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिलाय त्या संघाला तुम्ही नष्ट करायला निघाले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.


हेही वाचा :
मोठी बातमी : कन्हैया कुमार यांच्यावर प्रचारा दरम्यान हल्ला
शिरूर: स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाचा सर्व डाटा सुरक्षित –जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी
ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 पदांची भरती
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती
भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
Newsclick संपादक प्रबीर पुरकायस्थ यांची अटक बेकायदेशीर, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय