Bird flu in Latur : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला असून, प्रशासनाने अलर्ट मोडवर काम सुरू केले आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील कावळ्यांच्या अचानक मृत्यूच्या घटनांमुळे चिंता वाढली होती. भोपाळ येथील वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानुसार या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार, उदगीर शहरातील 10 किलोमीटरचा परिसर ‘अलर्ट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक, नगरपरिषद वाचनालय, आणि पाण्याच्या टाकीच्या आसपासचा परिसर या झोनमध्ये समाविष्ट आहे. या भागात नागरिकांच्या हालचालींवर तसेच पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
150 हून अधिक कावळ्यांचा मृत्यू (Bird flu in Latur)
महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक परिसर, आणि पोलीस ठाण्याच्या आवारात आतापर्यंत 150 हून अधिक कावळे मृतावस्थेत सापडले आहेत. मृत्यूपूर्वी कावळ्यांची मान वाकडी होणे आणि झाडांवरून जमिनीवर कोसळणे या घटना विशेषतः निदर्शनास आल्या आहेत. पशुवैद्यकीय विभागाने मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी गोळा केले असून, या भागात तातडीने सर्वेक्षण सुरू आहे.
प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजना
बाधित क्षेत्रात कुक्कुटपालन केंद्रांची तपासणी आणि नमुन्यांची चाचणी करण्यात येत आहे. खाजगी वाहने बाहेर पार्क करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, पक्षी आणि प्राण्यांशी संपर्क टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संकटावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज
बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद घटना प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा :
अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान
भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल
धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले
राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर, पहा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?
चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतील अर्ज घेतले मागे, वाचा काय आहे कारण !
मूत्र पाजलं, काळं फासलं, मिरचीची धुरी दिली; ७७ वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेची छळवणूक