मुंबई, दि. २४ : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध कडक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांचा आग्रह धरला असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाट आली तर नाही ना ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
तर दुसरीकडे राज्यात डेल्टा प्लस चे रुग्णही सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात असली तरी तिसरी लाट राखण्याचे आवहान सरकारपुढे असल्याचे निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात दोन दिवसात नवीन नियमावली जाहीर करणार असल्याचीही माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले होते. राज्यातील लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने हटवला जाणार होता. परंतु राज्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि डेल्टा प्लस चे रुग्ण यामुळे पुन्हा निर्बंध कडक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.