आमदार निकोले यांच्या नेतृत्वाखाली चिक्कू उत्पादक संघांचे घेतली भेट
मुंबई : पीक विम्यासंदर्भात चिक्कू उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य न्याय देऊ असे कृषी मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र राज्य चिक्कू उत्पादक संघांच्या शिष्टमंडळाने माकप डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली भेट शासकीय निवास्थानी घेतली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी चिक्कू उत्पादक संघांचे विनायक बारी म्हणाले की, गेल्या २०१३-१४ वर्षापासून चिकू फळाला विम्याचे कवच प्राप्त झाले असून त्याचा फायदा पालघर, रायगड, अहमदनगर जिल्ह्यातील चिकू बागायतदारांना खरीप हंगामामध्ये बुरशीजन्य रोग्यांचा नुकसानीसाठी विमा कवच मिळत आहे. परंतु, यंदा ह्या फळ पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम रूपये ३००० प्रति हेक्टरी वरून एकदम रूपये १८,००० प्रति हेक्टरी केली असून ती वाढ अवाजवी असुन केवळ पालघर जिल्ह्यासाठी हि अन्यायकारक वाढ आहे. त्यामुळे चिकू बागायतदारांना भरणे शक्य होणार नाही. त्या अनुषंगाने कृषी मंत्र्यांनी विशेष लक्ष पुरवावे व होणारा अन्याय ताबडतोब दुर करावा, कारण विम्याचे ट्रिगर ०१ जुलै २०२१ पासून लागू होत असून विमा लाभधारक बागायतदारांना केवळ ०९ दिवसाचा अवधी हप्ता भरण्यासाठी मिळत आहे. तरी हा प्रश्न मंत्र्यांनी गांभीर्याने त्वरीत सोडवावा व आमच्या वरील अन्याय दुर करावा अशी पालघर जिल्ह्यातील चिकू बागायतदार यांच्या वतीने आम्ही करत आहोत असे बारी म्हणाले.
तसेच सन २०२१-२०२२ रोजी चिकू विम्यासाठी जी संरक्षित रक्कम आहे त्याचा हप्ता राज्य सरकार २५५०० केंद्र सरकार ७५०० व शेतकरी १८००० असे. एकूण ५१००० विमा कंपनीला दयावे लागतील. जर ५० टक्के विमा मिळाला तर शेतकऱ्यांना २७००० हेक्टरी मिळतील व कंपनीला २४००० रूपये फायदा होणार आहे. परंतु हे शेतकऱ्यांना मान्य नाही. राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून विमा कंपनीला ३३००० रूपये रक्कम जी देणार आहेत तो सरसकट हेक्टरी २५००० रू. शेतकऱ्यांना दिली तर राज्य सरकारचा खूप मोठा फायदा होईल. या सर्व गोष्टींचा सरकारने योग्य तो विचार करून बळीराजाला मदतीचा आधार द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य चिक्कू उत्पादक संघाच्या वतीने करण्यात आली.
त्यावर कृषी मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे म्हणाले की, पीक विम्यासंदर्भात चिक्कू उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य न्याय मिळवून देऊ. याप्रसंगी माकप डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य चिक्कू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी, खजिनदार यज्ञेश सावे, सदस्य अजय पाटील, सदस्य अभिजित राऊत, डॉ. आदित्य अहिरे उपस्थित होते.