Friday, November 22, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाभुकंप, वाचा मोठ्या घडामोडी

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाभुकंप, वाचा मोठ्या घडामोडी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाभुकंप झाला आहे. राज्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. रविवारी अजित पवार यांच्यासोबत ९ जणांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडल्याचे समोर आले. त्यानंतर आता शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांनी एकमेकांविरद्ध कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

आम्हाला नोटीस काढण्याचा काही अधिकार त्यांना नाही. पक्ष आणि चिन्ह आमचे आहे. घटनेची कायद्याची अडचण कुणाला येणार नाही याची खबरदारी आम्ही घेत आहोत. पक्षाच्या बळकटी साठी काम करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत राज्याची प्रगती करणार असे म्हणत आम्ही जे करतो ते पक्षाच्या हिताचे करत आहोत असे विधान अजित पवार यांनी केले आहे.

पुढे ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाचे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच आहेत असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच आमची कुणाची हकालपट्टी करायला बसलो नाही ..आम्ही बेरजेचे राजकारण करतो आम्ही पक्षाच्या भल्याची भूमिका घेतली आहे असेही ते म्हणाले.

तसेच, अजित पवार यांना पक्षाचा विधी मंडळ नेता म्हणून नियुक्ती केली आहे. विधान सभा अध्यक्ष सूचना केली प्रतोद नियुक्ती पक्ष करतो, माझ्या सूचना नुसार अनिल भाईदास पाटील हेच प्रतोद राहणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.

नऊ आमदार विरुद्ध दोन आमदार अपात्रतेची लढाई

राष्ट्रवादीने पक्षाने अजित पवार यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेण्याऱ्या नऊ आमदारांविरोधात कारवाई केली तर अजित पवार गटाने जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड विरोधात पाटील आणि आव्हाड यांना अपात्र करावे यासाठी विधान सभा अध्यक्ष यांच्याकडे पत्र दिले आहे.

जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्यात आले असून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीतच्या प्रदेश महिला अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे रविवारी राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मात्र आता कोल्हे यांनी युटर्न घेत मी शरद पवार साहेबांसोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : जयंत पाटलांना हटवलं, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी ‘यांची’ निवड

मोठी बातमी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली भावनिक पोस्ट, म्हणाले…

‘आम्ही अजितदादांबरोबर…’, बारामतीत फटाक्यांची आतिषबाजी; मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आनंदोत्सव

मोठी बातमी : अजित पवारांच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी स्पष्ट केली भुमिका, म्हणाले…

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय