Thursday, July 4, 2024
HomeNewsदापोली कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन

दापोली कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे चौथ्या दिवशी ही प्रशासकीय कार्यालयासमोर कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.

कृषि अभियांत्रिकी पदवीधारकांवर कृषि सेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रमामुळे अन्याय होत असल्याने हे अन्यायकारक धोरण तात्काळ थांबावा आणि या दोन्ही परीक्षेला तात्काळ स्थगिती द्या. राज्यांमध्ये कृषि अभियांत्रिकी शाखेसाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करा, मृद व जलसंधारण विभागामध्ये कृषि अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासून इतर शाखेच्या वैकल्पिक विषयांप्रमाणे कृषि अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय समाविष्ट करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय