Saturday, July 6, 2024
HomeNewsमोदी सरकारचा मोठा निर्णय! मुघल गार्डन नाव बदललं, 'अमृत उद्यान' या नावाने...

मोदी सरकारचा मोठा निर्णय! मुघल गार्डन नाव बदललं, ‘अमृत उद्यान’ या नावाने ओळखलं जाणार

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचं नाव मोदी सरकारने बदललं आहे. आता हे उद्यान अमृत उद्यान या नावाने ओळखलं जाणार आहे. राष्ट्रपती भवनात असलेलं मुघल गार्डन हे त्यातल्या सुंदर फुलांसाठी प्रसिद्ध आहे.
हे गार्डन पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी उपस्थिती लावतात. आता हे उद्यान अमृत उद्यान नावाने ओळखलं जाणार आहे.

अमृत उद्यानात काय आहे खास?

अमृत उद्यान हे १५ एकरमध्ये पसरलेलं विस्तीर्ण उद्यान आहे. या बागेत १३८ प्रकारचे गुलाब, १० हजारपेक्षा जास्त ट्यूलिप बल्ब, ७० विविध प्रकारची ५ हजार प्रकारची मोसमी फुलं असं सगळं या बागेत आहे. हे उद्यान देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी जनतेसाठी खुलं केलं होतं. त्यानंतर दरवर्षी वसंत ऋतूमध्ये हे भव्य उद्यान सगळ्यांसाठी खुलं केलं जातं. हे उद्यान म्हणजे राष्ट्रपती भवनाचा आत्मा आहे असंही म्हटलं जातं. मुघल गार्डन असं नाव असलेल्या या उद्यानाला आता अमृत उद्यान असं म्हटलं जाणार आहे. या संपूर्ण उद्यानाचा एक मोठा भाग हा वैविध्यपूर्ण गुलाबांसाठी ओळखला जातो. ब्रिटिश वास्तुविशारद एडवर्ड ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनाची आणि मुघल गार्डनचं डिझाईन केलं होतं.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय