जुन्नर, (प्रतिनिधी – रफीक शेख) : जुन्नर आणि परिसरातील विविध विकास कामांना मंजुरी मिळाली असून या कामांचे भुमिपुजन भाजपा नेत्या तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य आशाताई बुचके यांच्या हस्ते जुन्नर शहरात सोमवारी (दि.23) पार पडले.
---Advertisement---
ही आहेत विकास कामे –
- खलीलपुराकाला वावर ते ताजने मळा ते उत्तरेश्वर मंदिरापर्यंत रस्ता डांबरीकरण व पाईप गटर करणे
- पंचलिंग मंदिरा शेजारी अमरनाथ सेवा मंडळ चौथरा शेड
- दशनाम गोसावी समाज दफनभूमी संरक्षक भिंत
- संतोष कबाडी घरापासून मुख्य रस्ता पर्यंत पाईप गटर
- ओमशांती नगर येथिल कुमकर सर नविन बंगला ते काँलेज पाईपगटर
- शिपाई मोहल्ला येथे पाईप गटार व सिमेंट काँक्रीटीकरण
यावेळी जुन्नर तालुका अध्यक्ष संतोष नाना खैरे, भाजपा जुन्नर शहर अध्यक्ष सचिन खत्री, मा. पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत मिरगुंडे, मा. नगराध्यक्ष अनिल मेहेर, संजुभैय्या परदेशी, गणेश सुर्यवंशी, प्रदेश सोशल मीडिया सदस्य निलेश गायकवाड, अनिल रोकडे, मंदार बुट्टै, किरन काळे, दत्ता वाकचौरे व पदाधिकारी व कार्यकर्ते व जुन्नर शहरातील नागरिक उपस्थित होते.
---Advertisement---