Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभारतरत्न मोक्षगुंडम विश्वेशरैया यांचा आदर्श आजच्या अभियंत्यांनी घ्यावा - राजेंद्र पवार

भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेशरैया यांचा आदर्श आजच्या अभियंत्यांनी घ्यावा – राजेंद्र पवार

राष्ट्रीय अभियंता दिनानिमित एरिया संस्थेच्या वतीने आदर्श कार्य करणाऱ्या अभियंत्याचा सन्मान

पुणे/क्रांतिकुमार कडुलकर
: भारतरत्न मोक्षगुंडम विस्वेश्वरैया यांनी अभियंता कसा असावा आणि तो काय करू शकतो याचा आदर्श निर्माण करुन दिला आहे. तोच आदर्श घेऊन सर्व क्षेत्रातील आजच्या अभियंत्यांनी काम करुन समाजाचे आणि देशाचे हित जोपासले पाहिजे असे मत महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले. एरिया या सोलर क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने अभियंता म्हणून आदर्श कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी पवार बोलत होते .

पुढे ते म्हणाले की, अभियंता म्हणून नुसती नोकरी न करता समाजासाठी आपण काहीतरी लागतो या नात्याने आपण कार्य केले पाहिजे.आज अभियंता समाजापुढे आदर्श निर्माण करणारा असला पाहिजे. सर्व समाजासाठी आणि वंचित घटकाला त्यांच्या कामातून मदत झाली पाहिजे असे आज च्या दिवसी सर्वांनी संकल्प केला पाहिजे असे पवार यांनी उपस्थित अभियंता यांना आवाहन केले. ऑल इंडिया रिनेवेबल एनर्जी आसोशिएशन च्या वतीने राष्ट्रीय अभियंता दिनानिमित आदर्श अभियंता सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी महावितरणचे कोथरुड विभागाचे अभियंता राजेश काळे , धनकवडी विभागाचे जयश्री अत्राम, गणेशखिंड चे शंकर पाटील तसेच उत्कृष्ट विभागाला ही पुरस्कार आणि सन्मान पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते देण्यात आला .



या समारंभास मुख्य अभियंता राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता संतोष पटणी, ऑल इंडिया रिनेवेबल एनर्जी आसोसिएशन चे पुणे अध्यक्ष विवेक सुतार, विभागीय अध्यक्ष संतोष सुराणा, संस्थापक सदस्य मुकुंद कमलाकर, संकेत सुरी व अमित देवताळे, तसेच विविध क्षेत्रातील अभियंता व पुणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

संबंधित लेख

लोकप्रिय