Friday, November 22, 2024
Homeजिल्हापुण्यात भारत गायन समाजातर्फे हार्मोनियम वर्कशॉप संपन्न

पुण्यात भारत गायन समाजातर्फे हार्मोनियम वर्कशॉप संपन्न

पुणे : भारत गायन समाजामार्फत हार्मोनियम शिकणाऱ्या व शिकू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी आयोजित केलेला हार्मोनियम वर्कशॉप नुकताच संपन्न झाला. हा वर्कशॉप 2 मे ते 11 मे सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत भारत गायन समाजाच्या सभागृहात शनिपार येथे आयोजित केला होता. 8 वर्षाची ओवी कोल्हे, 14 वर्षाचा मिलीत रोझेकर, 30 वर्षाचा विशाल बागुल, 72 वर्षाच्या श्यामल अभ्यंकर असे विविध वयोगटातील एकूण 33 जण या कार्यशाळेत सहभागी झाले.

कुठली कला शिकायची असेल तर त्याला वयाची मर्यादा नसते तर शिकण्याची जिद्द लागते, याच उद्देशाने हार्मोनियम कार्यशाळा आयोजित केली होती असं मत धनश्री गिजरे यांनी मांडलं. राग, गाण्याची लय समजण्यासाठी विविध खेळ, धूनचे प्रकार, पलटे,नगमा, मराठी व हिंदी गीत, हार्मोनियमचा उगम अशा विविध पैलूंची ओळख या निमित्ताने सर्वांना झाली.

कुणाला उतार वयात का होईना संगीतात आवड निर्माण झाली तर कुणाला हार्मोनियम शिकण्याबाबतची वाटणारी भीती कमी झाली तर कुणी पहिल्यांदाच हार्मोनियमची ओळख झाली अशी विविध मनोगतं सहभागी झालेल्यांनी मांडली. तबला साथ जयेश जोशी यांनी केली. छायाचित्र व ध्वनिमुद्रण यासाठी याज्ञी जोशी यांनी सहाय्य केले. समारोपाच्या दिवशी सहभागी झालेल्या सर्वांना संस्थेच्या सहकार्यवाह शिल्पा पुणतांबेकर आणि संस्थेच्या कार्यवाह श्रीमती अमिता दुगल यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, वाचा काय आहे प्रकरण

पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सर्पदंश झाल्यास नागरिकांना वेळेत औषधोपचार घेण्याचे डॉ. सदानंद राऊत यांचे आवाहन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

संतापजनक : सांगलीत नीट परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी

संबंधित लेख

लोकप्रिय