Tuesday, July 2, 2024
Homeताज्या बातम्याBarti : यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण; 'इतके' हजार रुपये मिळणार विद्यावेतन

Barti : यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण; ‘इतके’ हजार रुपये मिळणार विद्यावेतन

Barti Training Program : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) [Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute] या स्वायत्त संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा, न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा), पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण, बँक, (IBPS) रेल्वे, एल. आय. सी इतर तत्सम स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. (Barti)

स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 30 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयानुसार सर्वकष धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने बार्टी, पुणे मार्फत सम 2024-25 करिता संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या (नागरी सेवा) दिल्ली व महाराष्ट्र करिता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा (राजपत्रित), न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा, पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण तसेच बैंक (IBPS) रेल्वे, एल.आय.सी या व इतर तत्सम स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणाकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

● आवश्यक पात्रता :

  1. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा,
  2. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.
  3. उमेदवाराचे वय व शिक्षण संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा, न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा) तसेच पोलीस व मिलिटरी भरती व बैंक (IBPS) रेल्वे, एल. आय. सी या व इतर तत्सम स्पर्धा परीक्षांच्या अटी व शर्ती नुसार असावे.
  4. रु. 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असेल.
  5. अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  6. उमेदवार दिव्यांग असल्यास 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी.

● आरक्षण : महिला 30% दिव्यांग (PWD) 5%, अनाथ 1%, वंचित 5% (वाल्मिको व तत्सम जाती होलार, वेरड, मातंग, मांग, मादगो, इ.साठी), जागा आरक्षित असतील.

● विद्यार्थी निवडीचे निकष : सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड हो सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test-CET) द्वारे प्राप्त गुणांच्या आधारे केली जाईल.

● ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : 03 जुलै 2024

पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना http://www.barti.in या संकेतस्थळावरुन दिलेल्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज सादर करता येणार आहे.

● विद्यार्थ्यांना किती विद्यावेतन मिळणार?

केंद्रीय लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान दरमहा अनुक्रमे 13 हजार रुपये विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा व न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी व पोलीस, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान दरमहा अनुक्रमे 10 हजार रुपये विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येणार आहे.

● अडचणी असल्यास संपर्क साधावा!

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी वरील उपलब्ध लिंक वरील मार्गदर्शक सूचना वाचून ऑनलाईन अर्ज सादर करावा, अर्ज भरताना तांत्रिक अडचणी आल्यास helpdesk.schemebarti@mail.com या ईमेल वर संपर्क साधावा, संपर्क क्रमांक : 020-26343600/26333330/26333339

अधिकृत वेबसाईट
http://barti.maharashtra.gov.in

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी
http://trtipune.in/bartregmay24/

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : विराट कोहली पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माचाही मोठा निर्णय

मोठी बातमी : टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा

T20 World Cup : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय

India Post : भारतीय पोस्ट मध्ये 10वी पाससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !

बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !

अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय