बारामती प्रचारसभेत सूरज चव्हाणचं बारामतीकराना आवाहन (Baramati)
बारामती / वर्षा चव्हाण : बारामती मतदारसंघातून दि.28 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी कण्हेरी येथून प्रचाराचा शुभारंभ झाला. जोरदार शक्तिप्रदर्शन करत अजित पवार यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेसाठी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने खास उपस्थिती लावली होती. एवढंच नव्हे तर त्याने भाषण करत अजित पवारांना मतं देण्यासाठी जनतेला आवाहन केले. (Baramati)
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरज चव्हाणची खास भेट घेतली होती. त्याला शाबासकीची थाप देऊन अजित पवारांनी कौतुक केलं होतं. यावेळी अजित पवारांनी सूरजला त्याच्या गावात चांगलं घर बांधून देण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
नुकताच सूरजच्या गावातल्या नव्या घराचा भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी सूरजने अजित पवारांचे आभार व्यक्त केले होते. त्यानंतर 28 ऑक्टोबरला सूरज तोंड लपवत अजित पवारांच्या बारामती सभेत उपस्थित राहिला.
अजित पवारांच्या सभेत सूरज चव्हाण आल्याचं समजाताच जनता ओरडू लागली. त्यानंतर अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सूरजचं स्वागत केलं. पुढे सूरज एका मिनिटांचं भाषण करत हात जोडून म्हणाला, “नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण. आई मरीमाता… ओम नमः शिवाय… शिव शंभो… हर हर महादेव… ऐका बाप्पा मोरया… माझं स्वप्न दादांनी पूर्ण केलंय आणि गरिबांना दादांनी मदत केली. तर मनापासून दादांचे आभार मानतो.
आपल्या दादांना झापूक झुपूक होऊन मतदान करा.” असे आपल्या स्टाईलमध्ये बारामतीकरांना आवाहन केले व उपस्थिताचे पुन्हा एकदा मन जिंकले.


हेही वाचा :
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित