पिंपरी चिंचवड : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृता महोत्सवी वर्षा निमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामधे ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांनी प्रत्यक्ष तुरुंगवास भोगला आहे व ज्यांचा प्रत्यक्ष या लढ्यात सहभाग होता, अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांशी सवांद साधून त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार सन्मान करण्यात येत आहेत.
यानिमित्ताने सर्वप्रथम चिंचवडगावातील चापेकर चौकातील चापेकर बंधूच्या समूह शिल्पास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करीत या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली व स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांशी वैयक्तिक त्यांच्या घरी जाऊन त्याच्यांशी सवांद साधून सन्मान व सत्कार करण्यात आले.
कोकण कृषी विद्यापीठात तब्बल 30,000 रूपये पगाराची नोकरी, 2 दिवस शिल्लक
बॉम्बे उच्च न्यायालयात 25 रिक्त जागांसाठी भरती, 50,000 रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी !
यामधे जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै.वसंत तथा दादा केसकर, कै.सदाशिव नाथोबा सायकर, कै.जनार्दन गणपत मिरजकर, कै.जगन्नाथ विष्णु मिरजकर, कै.मारूती कृष्णाजी सायकर, कै.दिगंबर बाबूराव ढवळे, कै.वामन गणपत वस्ते, कै.वैजनाथ शंकरलाल पंडित, कै.निवृत्ती विठोबा वाळुंजकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात आले.
भाजयुमोच्या या उपक्रमात भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस व स्थानिक नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश क्रिडा विभाग संयोजक जयदेव डेंब्रा, युवती विभाग सह संयोजिका व प्रभाग स्वीकृत सदस्य वैशाली खाडये, भाजयुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजित कुलथे, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस व प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव, सरचिटणीस तेजस्विनी कदम,दिपक नागरगोजे, उपाध्यक्ष सतीश नागरगोजे, प्रकाश चौधरी, पराग जोशी, प्रियांका शाह, सारिका माळी, शुभांगी कसबे, नम्रता माळी, गोपाल मंडल, तेजस नांणेकर, तुषार मेंढापुरकर, आशिष नागरगोजे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
– क्रांतिकुमार कडुलकर
केंद्रीय माहिती आयोगात नोकरीची संधी, 60 हजार रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी !
10 वी आणि 12 वी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची चांगली संधी, आजच अर्ज करा !