Home ताज्या बातम्या धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड...

धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट

पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, 24 पानांची लिहली सुसाईड नोट Atul Subhash Engineer commits suicide being harassed by his wife nikita-singhania

बंगळुरू : अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या AI इंजिनियर अतुल सुभाष (Atul Subhash) यांनी पत्नीच्या छळाला कंटाळून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांनी मृत्यूपूर्वी तब्बल 24 पानांचे सुसाईड नोट लिहिले असून, त्यात पत्नी निकिता सिंघानिया (Nikita Singhania) हिच्या छळाची कहाणी सविस्तर मांडली आहे. हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, नेटकऱ्यांनी निकिता सिंघानिया यांच्याविरोधात संताप व्यक्त करत ट्रोल केले जात आहे.

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहणाऱ्या निकिता सिंघानिया आणि बंगळुरूमध्ये राहणाऱ्या अतुल सुभाष यांची भेट 2019 मध्ये एका मॅट्रिमोनियल साईटवर झाली होती. दोन वर्षांनी या दोघांनी विवाह केला. विवाहानंतर निकिता दिल्लीमध्ये राहून नोकरी करत होती. मात्र, यानंतर निकिता यांनी अतुल यांच्याविरोधात तब्बल नऊ गुन्हे दाखल केले. यामध्ये निकिता यांनी सेटलमेंटच्या नावाखाली तीन कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा आरोप अतुल यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये केला आहे.

अतुल सुभाष यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नीने केलेल्या छळाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी लेखी स्वरूपात कसे मानसिक त्रास सहन करावा लागला याचे वर्णन केले आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी #NikitaSinghania हॅशटॅग ट्रेंड करत निकिता यांच्याविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे. यावेळी लोक या महिलेला मोठ्या प्रमाणात ट्रोल करून संताप व्यक्त करीत आहेत.

या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. निकिता सिंघानिया यांच्याविरोधात येणाऱ्या आरोपांचीही चौकशी केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस करत असून निकीता सिंघानिया यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.

Atul Subhash

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर, शाळांच्या वेळेत बदल

मोठी बातमी : ‘वेलकम’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे अपहरण, खंडणीसाठी 12 तास टॉर्चर

ब्रेकिंग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या विविध परिक्षांचा निकाल जाहीर

बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास अटक

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत 275 जागांसाठी भरती

मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर

वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी

लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !

पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती