Monday, June 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

सावरखेडा गावात दीडशे गुंडांचा बौद्ध वस्तीवर जीवघेणा हल्ला! ५ जखमी तर एकजण गंभीर; हिंगोली जिल्ह्यातील घटना.

---Advertisement---

(पुणे) : २४ जून २०२० रोजी सावरखेडा जि. हिंगोली या ठिकाणी अज्ञात गुंडांंच्या १०० ते १५० जणांच्या टोळीने बौद्धवस्तीवर सशस्त्र असा जीवघेणा हल्ला केला, यामध्ये ५ जण जखमी तर १ जण गंभीर जखमी असून हिंगोली रुग्णालयात उपचार घेत आहे. आरोपींना अट्रोसिटी कायद्याअंतर्गत तसेच मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावे या मागणीचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

         

---Advertisement---

   यावेळी BHIM SQUAD चे सदस्य राहुल गायकवाड, अक्षय तायडे, अक्षय कांबळे, ओंकार कांबळे, कौस्तुभ ओव्हाळ उपस्थित होते

पुण्यात धक्कादायक ऑनर किलिंगची घटना, सवर्ण मुलीवर प्रेम केल्याने दलित युवकाची निघृन हत्या.

   लोकांच्या म्हणण्यानुसार, “२ महिन्यांपूर्वी जातीयवादी तरुणाने स्वतःचा वाढदिवस जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर साजरा केला होता. बळीहरण या तरुणाने लॉकडाऊन आहे, एवढे मुलं नका जमवू, असे म्हणाला. म्हणूनच तीच बाब लक्षात घेऊन दोन महिन्यानंतर आज अचानकपणे १५० जातीय गुंडांनी सशस्त्र हल्ला केला.” 

    चाकू, तलवारी, कुराडी घेऊन हे गुंड बौद्ध वस्तीत घुसले आणि एक परिवाराला टार्गेट केले. यात महिलांनाही मारहाण असून ५ तरुणांवर जीवघेणा हल्ला केला असल्याचे सांगण्यात आले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles