Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

दंगली पेटवणाऱ्या सर्वधर्मीय नेत्यांना विचारा तुमच्या सर्वोच्च नेत्यांची मुलं कुठे आहेत ? – विश्वंभर चौधरी

पुणे : दंगली पेटवणाऱ्या सर्वधर्मीय नेत्यांना विचारा तुमच्या सर्वोच्च नेत्यांची मुलं कुठे आहेत?, असा प्रखड सवाल सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी कोल्हापूर दंगलीवरून केला आहे.

कोल्हापूरात आक्षेपार्ह स्टेट्सच्या विरोधात काल कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यानंतर हिंदूवादी संघटनेने कोल्हापूर मध्ये आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत काही ठिकाणी दगडफेकी तर काही ठिकाणी वाहनांची तोडफोड केली. दरम्यान संपूर्ण दिवसभर कोल्हापूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना लाठीमार देखील करावा लागला. सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती पसरु नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं मोबाईल कंपन्यांना दिले होते. दरम्यान जिल्ह्यात येत्या 19 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश आहेत.

या प्रकरणावर विश्वंभर चौधरी यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले दंगली पेटवणाऱ्या सर्वधर्मीय नेत्यांना विचारा तुमच्या सर्वोच्च नेत्यांची मुलं कुठे आहेत? उन्हात रस्त्यावर दगड घेऊन आहेत की परदेशात वातानुकूलित वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेत आहेत धर्माचा ठेका तुम्ही गोरगरीबांनी घेतलाय, असा सवालही त्यांनी केला आहे.

ते पुढे म्हणतात, त्यांना तुमच्या बिनडोकपणाच्या जीवावर आर्थिक ठेके घ्यायचे आहेत. स्वतःची संपत्ती वाढवायची आहे, तुम्ही बसा तुरूंगात खडी फोडत, असं म्हणत विश्वंभर चौधरी यांनी आपली भूमिका मांडली आहे.

---Advertisement---

हे ही वाचा :

राज्य सरकारची मान शरमेने खाली घालणारी “ही” बाब…

---Advertisement---

कोल्हापुर : संभाजीराजे छत्रपतींनी संताप केला व्यक्त, दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र हादरला! हत्येनंतर मृतदेहाचे केले तुकडे; नंतर कुकरमध्ये उकळले

नागपूर : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

ICAR : सोलापूर येथील राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत विविध पदांची भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles