Friday, April 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड'तुकोबारायांची पालखी सजवायंच काम मुस्लिम बांधव करत आहेत'; पण...या अभिनेत्याची सणसणीत पोस्ट

‘तुकोबारायांची पालखी सजवायंच काम मुस्लिम बांधव करत आहेत’; पण…या अभिनेत्याची सणसणीत पोस्ट

पुणे : सध्या राज्यभरात सोशल मिडिया आणि आक्षेपार्ह पोस्टमुळे दणावाचे वातावरण आहे. तर काही ठिकाणी जाणीवपूर्वक दंगल घडविण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप सत्ताधारी करताना दिसत आहेत. या वाढत्या घटनांमुळे मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलविण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? हे धार्मिक धुर्वीकरण करण्याचा प्रयत्न तर नाही ना? असे अनेक प्रश्न तयार होत आहे. असेच असताना हिंदू -मुस्लिम ऐक्याचे ज्वलंत, जितेजागते उदाहरण देत प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

तुकोबारायांची पालखी सजवायंच काम मुस्लिम बांधव करत आहेत’; पण…एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट धर्म – जातीचे राजकारण करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

किरण माने यांनी लिहिले पोस्ट आहे तरी काय ?

…तुकोबारायांची पालखी सजवायचं काम लै जोशात सुरू हाय भावांनो. सगळ्या वारकर्‍यांचं मन मोहून टाकनारा चांदीचा रथ झळकायला लागलाय.. चांदीची पालखी चमकायला लागलीय… हे सगळं काम केलंय पिंपरीचे आपले मुस्लीम बांधव कमर अत्तार यांनी !

देहूतल्या देऊळवाड्यात कमरभैय्यांसोबत इम्रान शेख, उमर अत्तार, जाफर खान, शेहनाज आलम, अतिम बागवान हे सगळेच बांधव तल्लीन होऊन पालखी सजवायचं काम करत आहेत. अब्दागिरी, गरुडटक्के झळकवलेत… तुकोबारायांच्या पादुकांना आणि त्यांच्या पूजेच्या साहित्याला या सेवेकर्‍यांनी आनलेलं तेज पाहून डोळे दिपायला लागलेत. “तुकोबारायांची सेवा करताना आमाला लै खुशी होते. गेल्या सहा वर्षापासून ही संधी आम्हाला मिळतेय, त्यामुळे आम्ही स्वत:ला भाग्यशाली समजतो.” असं या कारागीरांचं म्हननं हाय.

रथावर आलेली काळसर पुटं त्यांनी जशी रिठा, लिंबू, चिंच, पावडरनं काढून टाकली आनि शुभ्र, लख्ख झळाळी आनली… तशी लोकांची जातीभेदानं-धर्मद्वेषानं काळवंडलेली मनं घासूनपुसून स्वच्छ करन्याचं साधन कुठलं आसंल, तर ते तुकोबारायांचे अभंग ! ते वाचनार्‍या मानसाला बहकवन्याचा दम कुठल्या व्हाॅटस् ॲप फाॅर्वर्डमधी नाय गड्याहो.

आजच्या नासलेल्या भवतालात, “भेदाभेद भ्रम अमंगळ” हा तुकोबा माऊलीचा संदेश करेक्ट आनि परफेक्ट कळलेल्या वारकरी संप्रदायाचा आपल्याला लै म्हंजी लैच अभिमान हाय !

किरण माने.

हे ही वाचा :

शुल्क प्राधिकरण, प्रमुख बंदरे मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

राज्य सरकारची मान शरमेने खाली घालणारी “ही” बाब…

कोल्हापुर : संभाजीराजे छत्रपतींनी संताप केला व्यक्त, दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र हादरला! हत्येनंतर मृतदेहाचे केले तुकडे; नंतर कुकरमध्ये उकळले

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय