सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक यांनी आपल्या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या बॅनरखाली महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या अध्यक्षा आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढला.
आशा व गटप्रवर्तकाना कायम करा, त्यांना किमान मासिक वेतन सुरू करा, रजा, ग्रॅच्युईटी, पेन्शन आदी लाभ द्या व इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आशा सहभागी झालेल्या होत्या.
या मोर्चात विजयाराणी पाटील, प्रियांका तावडे, रुचिका पवार, स्वप्नाली चव्हाण, कांचन देऊसकर, अंकिता कदम, विद्या सावंत, सुप्रिया गवस आदींसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हे ही वाचा :
महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात
डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ
कामगार संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; कोणते बदल होणार पहा !