Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

“स्मार्ट सिटीचे शिल्पकार, अजित पवार” : अजित गव्हाणे

अजित अनंतराव पवार हे नाव माहीत नाही, असा कोणी उभ्या महाराष्ट्रात सापडणे अवघड. अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तरुण पिढीचे नेते. ‘फायरब्रँड’ हा शब्द लागू व्हावा असे व्यक्तिमत्त्व. रोखठोक आणि थेट बोलणे यामुळे अगदी विरोधकही ‘दादा’च म्हणतात असा वकूब असलेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमीच केंद्रस्थानी असलेले नेते. शिस्त, वक्तशीरपणा आणि व्यसनांपासून चार हात लांब असे राजकारणात फारसे न दिसणारे व्यक्तिमत्त्व. पहाटेपासून कामाला सुरुवात आणि अगदी रात्रीपर्यंत कामाचा सपाटा सुरूच. आजच्या राजकारणात लुप्त होत असलेली समाज आणि विकासकेंद्रित कार्यशैली अजित पवार यांनी आजही जपली आहे. जबरदस्त संघटनकौशल्य ही अजितदादांच्या ताकदीची खरी ओळख. त्यामुळेच चांद्यापासून बांद्यापर्यंत त्यांचे कार्यकर्ते सर्वत्र विखुरलेले. पक्ष संघटनेची ही ताकद दादांनी नव्या दमाने
उभी केली.

---Advertisement---



औद्योगिकनगरी असणाऱ्या पिंपरी -चिंचवड शहराने कात टाकली. हे शहर ‘स्मार्ट सिटी’ म्हणून देशात गौरविण्यात आले. या शहरातील प्रश्नांची जाण असणारे असे हे नेतृत्व आहे. पिंपरी-चिंचवडच्या परिवर्तनाचे शिल्पकार अजितदादा पवार हे आहेत.अल्पकाळाच्या खासदारकीनंतर ते मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेत दाखल झाले. गेली ३० वर्षे महाराष्ट्राची विधानसभा हा कणखरपणा अनुभवत आहे.पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

पिंपरी-चिंचवडसारख्या उद्योगनगरीतील प्रश्नांची
जेवढी जाण तेवढीच तळमळ गडचिरोलीमधील आदिवासी बांधवांच्या प्रश्नांची. अशाच या आग्रही, कणखर स्वभावातून शिक्षण, आरोग्य, रस्ते विकास, धरणग्रस्त, आपदग्रस्त, उद्योग, कला, क्रीडा, संस्कृती अशा प्रत्येक क्षेत्राला विकासाचा स्पर्श केला तो अजितदादांनी. यातूनच हे ‘फायर ब्रँड’ नेतृत्व उदयाला आलेले आहे. या लोककल्याणकारी महाराष्ट्र सुपुत्राचा परिसस्पर्श आपल्या पिंपरी-चिंचवड शहरालाही झाला. त्यातूनच या शहराने कात टाकली. औद्योगिकनगरी असणारे हे शहर स्मार्ट सिटी म्हणून देशात गौरवले. यासर्व परिवर्तनात, विकासवारीत अग्रेसर ठरलेल्या शहराचे शिल्पकार अजितदादा पवार. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची, गौरवास्पद आहे.

शरद पवार यांनी या शहरात कारखानदारी यावी,उद्योगांची भरभराट व्हावी यासाठी अनेक उपाययोजना अमलात आणल्या. त्या राबवल्या,वाढवल्या आणि यातूनच पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी आकार घेत होती. या नगरीला याच विकासाच्या वाटेने पुढे नेण्यासाठी अजितदादा पवार यांनी सूत्रे हातात घेतली. या शहराचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आणि या शहराला स्मार्ट सिटीपर्यंत आणून ठेवले आहे. शहराचा विस्तार भविष्यात किती होऊ शकतो, याचा विचार अजितदादांनी मागच्या वीस वर्षांपूर्वीच केला होता. त्यामुळे या शहराला चहूबाजूंनी कनेक्टिव्हिटीचे नियोजन केले. त्याचीच परिणीती आज दिसून येते.

वाढते शहर लक्षात घेऊन सुसज्ज असे १२ मीटर, १८ मीटर, ९० मीटर, ६० मीटर, १२० मीटरचे बीआरटी रस्ते आज वाहतूक कोंडीचा ताण ८० टक्क्याने कमी करत आहेत. शहराचे वैभव ठरणारा नाशिकफाटा येथील जेआरडी टाटा उड्डाणपूल उभा केला. भोसरीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जिजामाता उड्डाणपूल बांधला. भक्ती-शक्ती येथील रोटरी मार्ग, ग्रेडसेप्रेटर उभारत नदी अलीकडे आणि पलीकडे दोन भागात वसलेले हे शहर अजितदादांनी जोडले. शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातून आता १५ मिनिटात बाहेर पडता येईल इतके अचूक नियोजन आज प्रत्यक्ष साकारले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने १५ वर्षे शहरामध्ये एकहाती सत्ता राखत नागरिकांना निरोगी आरोग्य तर दिलेच. याशिवाय पर्यावरण संतुलनाचा मेळ घातला. दुर्गादेवी टेकडी उद्यान, अप्पूघर, बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय विकसित केले. अशीच शहरात दोनशेहून अधिक उद्याने विकसित केली. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे करोडो रुपयांचे एसटीपी प्रकल्प उभे केले. शहराचा सखोल किंवा उंचवट्याचा भाग असला तरीही पाण्याची योग्य उपलब्धता हे नियोजन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात अजितदादा यांचे.आता केवळ पवना धरणावर अवलंबून राहावे लागणार नाही. तर भामा आसखेड या प्रकल्पातून १६० एमएलडी तर आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी शहराला अतिरिक्त उपलब्ध झाले आहे. यासाठीचे नियोजन दादांनीच केले होते. आणि २०१९ मध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हे पाणी अक्षरशः या शहरासाठी खेचून आणले आहे ही वस्तुस्थिती आहे.

शहराची लोकसंख्या जवळपास ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा मिळाव्यात, लोकांचं जगणं सुसह्य व्हावं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २० वर्षांपूर्वी मोठा व्यापक दृष्टिकोन ठेवला. तो अमलात आणण्यासाठी पावले उचलली आणि त्याचा परिणाम म्हणजे पिंपरी-चिंचवड शहर हे स्मार्ट शहर म्हणून ओळखले जात आहे. या सर्व नियोजनामध्ये त्यांनी शहराचा पुढील ५० वर्षांचा विचार केला असल्याचे पदोपदी जाणवते. यात अजितदादांचा मोलाचा वाटा आहे. दादांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

(लेखक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे
पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष आहेत)

हे ही वाचा :

---Advertisement---

विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव

PCMC : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, राहुल कलाटे यांचा शिंदे गटात प्रवेश

ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ब्रेकिंग : किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडिओवर सोमय्या म्हणतात…

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles