Monday, December 23, 2024
Homeराज्यसंतापजनक : दलित वस्तीचा पाणीपुरवठा बंद केल्याने दलित कुटुंबीयांवर गाव सोडण्याची वेळ

संतापजनक : दलित वस्तीचा पाणीपुरवठा बंद केल्याने दलित कुटुंबीयांवर गाव सोडण्याची वेळ

अमरावती : पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राला कलंकीत करणारी घटना घडली आहे, अमरावतीच्या सावंगी मग्रापूर गावातील दलितांनी पाण्यासाठी गाव सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गावाच्या इतर भागात नियमित पाणी पुरवठा होत असताना ग्रामपंचायतीने मागील 28 दिवसांपासून दलित कुटुंबे राहत असलेल्या वार्ड नंबर एक मध्ये पाणीपुरवठाच केला नाही, असा आरोप दलितांनी केला आहे. यासोबतच दलित वस्ती असल्यामुळे उपसरपंचांनी हे जाणीवपूर्वक केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना नाइलाजास्तव गाव सोडाव लागलं आहे.

लोकसेवा आयोगाच्या सन २०२२ च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

तहसीलदार, आमदार अशा सर्वांना निवेदन दिले, मात्र आम्हाला पाणी पुरवठा न झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे बुधवारी रात्रीपासुन दलित कुटुंबीयांनी, मुलाबाळासह गावाच्या बाहेरील विहिरीजवळ ठिय्या मांडला आहे. तसेच, शेकोट्या पेटवून त्यांनी रात्र काढली. जोपर्यंत आमच्या वार्ड नंबर एक मध्ये पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भुमिका त्यांनी घेतली आहे. या संबंधीचे वृत्त साम ने दिले आहे.

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी, अमरावतीच्या सावंगी मग्रापुर गावातील अनेक दलितांनी पाण्यासाठी रात्री गाव सोडून न्याय आणि पाणी मिळावे म्हणून गावाबाहेरील विहीरिजवळ दलित कुटुंब बसले आहेत याची दखल घेऊन राज्य सरकारने ज्या समाजकंटाकांनी पाणी बंद केले त्यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत अटक करावी. अशी मागणी केली आहे.

 

10 वी – 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मध्ये 1501 जागांसाठी भरती

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी देखील ट्वीट करून म्हटले आहे की, दलित वस्तीत पाणी नाही, अमरावतीतील सावंगी मरगापूर येथील दलितांनी सोडले गाव! प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी संबंधित जातीय प्रवृत्तीवर कठोर कार्यवाही करून दलितांनी पाणी द्यावे अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत आजही पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय असे म्हटले आहे.

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या उपसरपंचावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

संबंधित लेख

लोकप्रिय