---Advertisement---
जालना (प्रतिनिधी) : डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) जिल्हा कमिटी जालना च्या वतीने लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांंना बदनापूर येथे अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रंगडे काका यांच्या हस्ते प्रतिमेस हार घालण्यात आला.
यावेळी अनिल गायकवाड म्हणाले, महाराष्ट्रच्या कम्युनिस्ट चळवळीतील एक अग्रगरण्य सांस्कृतिक, साहित्यिक नेते शाहीर कॉम्रेड अमर शेख, शाहीर कॉम्रेड द.ना. गव्हाणकर यांच्या सोबत लालबावटा कला पथकाचे शिल्पकार होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील तसेच श्रमिक, दलितांच्या संघर्षाच्या चळवळीतील लोकशाहीर आणि अत्यंत प्रतिभाशाली साहित्यरतन कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे होते.
---Advertisement---
यावेळी अनिल गायकवाड, बाबासाहेब पाटोळे, गौरव चव्हाण,सुमित साबळे,विशाल साबळे, कप्पूसिंग जगरवाल उपस्थित होते.