Tuesday, July 2, 2024
Homeजिल्हाPune : अनंतराव पवार महाविद्यालयात उद्बोधन वर्ग आणि करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

Pune : अनंतराव पवार महाविद्यालयात उद्बोधन वर्ग आणि करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

पिरंगूट / दिपाली पवळे : अनंतराव पवार महाविद्यालयाच्या वतीने प्रथम वर्ष विद्यार्थी यांच्यासाठी उद्बोधन वर्ग मोठ्या उत्साहात संपन्न 26 जून 2024 रोजी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रथम वर्ष वाणिज्य, कला, संगणक, B.Voc, विज्ञान या विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन सकाळी 11 वाजता करण्यात आले. Pune

उद्बोधन वर्गास मार्गदर्शन करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी महाविद्यालयात चालणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली व महाविद्यालयातील चालणाऱ्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याचबरोबर महाविद्यालयात सर्वांनी नियमितपणे उपस्थित राहावे, वेळोवेळी महाविद्यालयातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, विद्यार्थ्यांना काही अडचणी असेल काही शंका असतील तर त्यांनी माझ्या सहकारी प्राध्यापकांसमोर मांडवे निश्चितपणे त्यांच्याकडून तुमच्या शंकांचे निरसन केले जाईल, असे विद्यार्थ्यांना आश्वासित केले. तसेच विविध विभागांच्या प्रमुखांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले, आणि त्या त्या विभागांमध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात, त्याची सखोल माहिती दिली. Pune

प्रा.डॉ.महेश कांबळे सर यांनी परीक्षेविषयी मार्गदर्शन केले प्रा.डॉ.गणेश चौधरी सर यांनी महाविद्यालयातर्फे प्रकाशित केले जाणारे ‘ ज्ञानदीप ’ या अंकात लेखन कसे करावे व लेखनाविषयी काही मौलिक सूचना त्यांनी विद्यार्थ्यांना केल्या. प्रा.भरत कानगुडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयी सखोल मार्गदर्शन केले. शारीरिक शिक्षण संचालक अनिल मरे सर यांनी महाविद्यालयातील स्पोर्ट्स विभाग व जिमखाना विषयी माहिती दिली.

राष्ट्रीय सेवा योजना याविषयी प्रा. दिलीप सोनवणे यांनी माहिती दिली. विद्यार्थी विकास समितीच्या उपक्रमा संदर्भात तसेच महाविद्यालयासतील सांस्कृतिक उपक्रमाविषयी प्रा. दत्तात्रय फटांगडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.मेघा पाटोळे, प्रा.विलास करवंदे, प्रा.वृषाली मारणे, प्रा.अक्षय शेटे, प्रा.दिप सातव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.पांगारे.पी.बी. तर कार्यक्रमाचे आभार डॉ.आनंदा सारंगे यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!

Barti : यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण; ‘इतके’ हजार रुपये मिळणार विद्यावेतन

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत तब्बल 102 जागांसाठी भरती

मोठी बातमी : विराट कोहली पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माचाही मोठा निर्णय

मोठी बातमी : टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा

T20 World Cup : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय

India Post : भारतीय पोस्ट मध्ये 10वी पाससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय