Wednesday, December 18, 2024
Homeबॉलिवूडमोठी बातमी; महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

मोठी बातमी; महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

(मुंबई) :- कोरोनाची महामारी कमी होताना दिसत नाही, कोरोनातुन सर्वसामान्यांपासून राजकीय नेते ते कालकारांची सुद्धा सुटका झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड क्षेत्रातून आलेल्या बातम्यांनी अनेकांना धक्का दिला आहे, आता अशातच महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे.

       महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या नंतर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन या संदर्भातील माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता मात्र अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन त्यांना करोना झाल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय