Wednesday, November 13, 2024
Homeताज्या बातम्याअमित शाह यांचं शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान; समर्थ रामदासांचा उल्लेख करत गुलामीचा उल्लेख

अमित शाह यांचं शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान; समर्थ रामदासांचा उल्लेख करत गुलामीचा उल्लेख

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलीच्या शिराळा येथे सभेत छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचा संदर्भ देत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. शहा यांनी विधान केले की, “गुलामीच्या काळात समर्थ रामदासांनी तरुणांना एकत्र करून शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला.” या विधानामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला असून, अमित शहा यांनी चुकीचा इतिहास मांडल्याचा आरोप केला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की, “रामदास स्वामी महान असतील, पण त्यांचा आणि शिवाजी महाराजांचा संबंध जोडू नये.” राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील शहा यांच्या विधानावर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी शहा यांनी केलेला इतिहासाचा संदर्भ चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले.

या सभेत अमित शहा यांनी बत्तीस शिराळा येथील नागपूजेची परंपरा महाविकास आघाडी सरकारने बंद केल्याचा आरोप केला. “आमचे सरकार आल्यास नागपंचमी परंपरेनुसार साजरी केली जाईल,” असेही शाह म्हणाले. “समर्थ रामदास यांचे पाऊल जिथे पडले ही ती पवित्रभूमी आहे. रामदास यांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून शिवाजी महाराज यांना पाठिंबा दिला होता. महाराष्ट्राची ही वीरभूमी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर यांची भूमी आहे.

आता 20 तारखेला तुम्हाला निर्णय घ्यायचाय.”, असंही अमित शाह म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीकडून आक्षेप घेतला जात आहे.तसेच, ‘मी दीड महिन्यांपूर्वी विदर्भ, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र आदी महाराष्ट्रातील सर्व भागांचा दौरा केला. तेव्हा महायुतीचे सरकार आणायचे आणि फडणवीस यांना विजयी करायचे, हीच तेथील लोकांच्या मनात इच्छा आहे किंवा त्यांनी ठरविले आहे, असे मला जाणवले.’ असं अमित शाह म्हणाले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक करताना शहा यांनी महायुती सरकारचे नेतृत्व पुन्हा फडणवीस यांच्याकडे सोपवण्याचे संकेत यातून दिल्याचे बोलले जात आहे.

या विधानावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी आक्षेप घेतला आहे, तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अमित शहा यांच्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Amit Shah

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर

चार दिवसात सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल ; भाजपच्या ‘या’ नेत्याची घोषणा

शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

ईडीच्या दबावामुळे भाजपसोबत गेले ; छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा समोर

नरेंद्र मोदींची राज्यातील नऊ सभांची मोहीम सुरू; महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार

मुंडे बहीण-भावावर प्रवीण महाजन यांच्या पत्नीचे गंभीर आरोप

महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर

मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा

संबंधित लेख

लोकप्रिय