Tuesday, July 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : थोरल्या पादुका मंदिरात माऊलींचे पालखी सोहळ्याचे स्वागत

ALANDI : थोरल्या पादुका मंदिरात माऊलींचे पालखी सोहळ्याचे स्वागत

आळंदी / अनिराज मेदनकर : आळंदी – पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात माऊलींच्या पादुका पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांनी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत आणल्या. ALANDI

यावेळी माऊलींचे पादुकांची महापुजा दही, दूधाचा व मधाचा अभिषेक,आरती, पुरणपोळीचा महानैवेद्य व पेढे प्रसाद वाढविण्यात आला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. यावेळी भाविकांची दर्शनास मोठी गर्दी झाली होती. ALANDI

माऊलींच्या वैभवी चलपादुका आषाढी पायी वारी पालखी सोहळ्या निमित्त पंढरपूरला मार्गस्थ होत असताना संत श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात विसावा घेऊन श्रीच्या वैभवी पादुकांची महापूजा हरिनाम गजरात परंपरेनुसार करण्यात आली. श्रींचे पादुका पूजेत हार, तुळशीहार, श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर माऊलींची आरती करण्यात आली. यावेळी रांगोळीच्या व फुलांच्या पायघड्या टाकण्यात आल्या होत्या. Alandi

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान चे प्रमुख विश्वस्त अँड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, विश्वस्त भावार्थ देखणे, खासदार श्रीरंग बारणे, व्यवस्थापक माऊली वीर, माजी महापौर नितीन काळजे, माजी नगरसेविका निर्मला गायकवाड, माजी सभापती अरुण चौधरी, चोपदार रामभाऊ रंधवे, राजाभाऊ रंधवे या मान्यवरांचा स्वागत व सत्कार ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल श्रीफळ, उपरणे देऊन करण्यात आले. Alandi

यावेळी हिरामण बुर्डे, मनोहर भोसले, रमेश महाराज घोंघडे, साहेबराव काशीद, राजेंद्र नाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. रोहिणी परुतगल्ले यांनी उत्कृष्ठ रांगोळीच्या पायघड्या घालून स्वागत सोहळ्यात भाविकांचे लक्ष वेधले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय