आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी नगरपरिषदेस भामा आसखेड प्रकल्प कुरुळी टँपिंग येथून पाणी पुरवठा पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा यंत्रणेतील तांत्रिक देखभाल दुरुस्ती साठी बंद रहाणार आहे. यामुळे कुरुळी टँपिंग येथून आळंदीस होणार पाणी पुरवठा गुरूवारी ( दि. ३ ) बंद राहणार आहे. अशी माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली. (Alandi)
आळंदीस पाणी पुरवठा होणार नसल्याने आळंदीत झोन निहाय होणारा पाणी पुरवठा देखील बंद रहाणार आहे. यामुळे नगरपरिषद हद्दीतील पाणी पुरवठा नळजोड धारकांना पाणी पुरवठा होणार नाही. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात आळंदी नगरपरिषदेस कार्यकारी अभियंता भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्प पुणे महानगरपालिका कार्यालयाने दूरध्वनी वरून कळविले आहे. पुणे महानगरपालिका भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्पाच्या विविध दुरूस्तीच्या कामांसाठी गूरूवारी ( दि. ३ ) रोजी संपूर्ण आळंदी नगरपरिषदेस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
पाणी पुरवठा नियमित सुरु झाल्या नंतर ठरलेल्या रोटेशन आणि झोन प्रमाणे आळंदीत नागरिकांना पाणी पुरठा केला जाणार असल्याचे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले. पुणे महानगरपालिका मार्फत दुरुस्तीचे काम विलंबाने झाल्यास आळंदीत देखील पाणी पुरवठा वितरीत करण्यास विलंब होऊ शकतो. या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी घ्यावी. असे आवाहन नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग प्रमुख यांनी केले आहे. नागरिकांनी आळंदी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागास सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे. (Alandi)
आळंदीत पिण्याचे पाणी पुरवठ्याचे अनियमियततेमुळे शहरात टँकर लॉबी वाढली असून टँकर पाणी पुरवठा दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे नागरिक, महिला त्रस्त झाले आहेत. आळंदीतील पूर्वीचे ५० वर असलेले विंधन विहिरी अनेक महिन्या पासून बंद आहेत. विंधन विहिरींचे देखभाल दुरुस्तीकडे आळंदी नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाले असून तीन, चार दिवसांनी हि पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने महिला वर्गात मोती नाराजी आहे. तत्कालीन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आमदार बाबाजी काळे यांचे समवेत झालेल्या बैठकीत पुढील १५ दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत पूर्ववत होईल अशी ग्वाही दिली होती. मात्र आमदार बाबाजी काळे यांचे समोर दिलेले आश्वासनास देखील आळंदीत केराची टोपली प्रशासनाने दाखवली असल्याची भावना नागरिकांत आहे.
येत्या काळात नियमित पाणी पुरवठा न झाल्यास आंदोलन छेडले जाईल असा खणखणीत इशारा शिवसेना आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ८ शाखा प्रमुख रोहिदास कदम यांनी दिला आहे.
---Advertisement---
---Advertisement---
Alandi : आळंदीकरांना गुरुवारी पाणी पुरवठा बंद रहाणार – मुख्याधिकारी खांडेकर
---Advertisement---
- Advertisement -