Monday, July 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : आळंदीत माऊलींचे अश्वांचे आळंदीत आगमन ; उत्साहात स्वागत

ALANDI : आळंदीत माऊलींचे अश्वांचे आळंदीत आगमन ; उत्साहात स्वागत

आळंदी / अनिराज मेदनकर : अंकली येथील (बेळगाव, कर्नाटक ) शितोळे सरकारांच्‍या वाड्यातून प्रस्थान झालेल्या श्रींचे अश्वांचे आळंदीत हरिनाम गजरात आगमन झाले. ALANDI

तत्पूर्वी सरदार हरप्रीतसिंह बिडकर, उमेश बिडकर यांचे श्रीकृष्ण मंदिरात अश्वांचे जोरदार स्वागत परंपरेने करण्यात आले. अश्व अलंकापुरीत येण्यापूर्वी पुण्यात पाहुणचार घेत हरिनाम गजरात आळंदीत आले. ALANDI

सरदार हरप्रीतसिंह बिडकर, उमेशजी बिडकर परिवाराच्‍या वतीने अश्वांचे परंपरेने स्‍वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील परंपरेने श्रीगुरु हैबतबाबा दिंडीने सामोरे जात अश्वांचे स्वागत विसाव्याचे जवळ करण्यात आले.

या प्रसंगी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख निरंजननाथ नाथजी, विश्वस्त भावार्थ देखणे, पालखी सोहळा मालक ऋषिकेश पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, महादजीराजे शितोळे सरकार, उर्जितसिह शितोळे सरकार, अश्व चालक सेवक तुकाराम कोळी, अक्षय परीट, श्रींचे सेवक राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, मानकरी योगेश आरु, स्वामी सुभाष महाराज, आळंदीकर ग्रामस्थ, वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. ALANDI

सोहळ्यातील परंपरेने अश्वांचे माउली मंदिरातही देवस्थानचे वतीने स्वागत झाले. आळंदीत येथील फुलवाले धर्मशाळेत परंपरेने अश्वांचा मुक्काम राहणार आहे. येथे भाविक दर्शनास गर्दी करतात.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !

बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !

अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा

दुर्बल घटकांसाठी वाचा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा केल्या !

प्रीपेड स्मार्ट मीटर संदर्भात महावितरणचा मोठा निर्णय

दिल्ली विमानतळावर भीषण अपघात, विमानतळाच्या पार्किंगचे छत कोसळले

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा !

मोठी बातमी : राज्याचा अर्थसंकल्प जाहीर, अर्थमंत्र्यांकडून अनेक घोषणांचा पाऊस

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय